दस्त हाताळणी शुल्क

 • दस्त हाताळणी शुल्क म्हणजे काय ?
   

  • सन 2002 पूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी पारंपारिक पध्दतीने केली जात होती. त्यावेळी पक्षकारांना दस्तासोबत दोन छायाप्रती (Photocopy) दाखल कराव्या लागत होत्या. पक्षकारांना प्रति पान रुपये 5/- प्रमाणे कॉपिंग चार्जेस भरावे लागत होते. दस्त नोंदणी संदर्भातील सर्व कामकाज मॅन्युअल पध्दतीने होत असल्यामुळे दस्त नोंदणीस जादा वेळ लागत होता आणि मूळ दस्त परत मिळण्यास किमान 15 दिवसांचा कालावधी लागत होता. शिवाय पक्षकारांना केवळ मूळ दस्त परत दिला जात होता.
  • सन 2002 पासून दुय्यम निबंधक कार्यालयात संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये पक्षकारांना त्याचा मूळ दस्त नोंदणीस स्विकारल्यापासून साधारण 30 मिनिटांच्या आत नोंदणी पूर्ण करुन परत दिला जातो. शिवाय सूची 2 ची प्रमाणित प्रत विनामूल्य दिली जाते. त्याव्यतिरिक्त सन 2012 पासून दस्ताची थंबनेल प्रिंट व सीडी देखील विनामूल्य देण्यात येत आहे.

  या संगणक प्रणालीवर होणारा खर्च भागविण्यासा ी पक्षकारांकडून आकारले जाणारे शुल्क म्हणजे दस्त हाताळणी शुल्क. सदर दस्त हाताळणी शुल्क शासन निर्णय दिनांक 20/08/2001 अन्वये लागू करण्यात आले आहे. सदर शासन निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली G.R. या िकाणी उपलब्ध आहे.

 • दस्त हाताळणी शुल्काचा दर काय आहे ?
   

  नोंदविल्या जाणा-या दस्तांच्या प्रत्येक पृष् ासा ी (Per Side of page) रुपये 20/- दराने दस्त हाताळणी शुल्क आकारले जाते.

 • दस्त हाताळणी शुल्क को े व कसे भरावे लागते ?
   

  दस्त हाताळणी शुल्क दस्त नोंदणीच्या वेळी दुय्यम निबंधक कार्यालयात रोखीने भरावे लागते.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]