नोदणी फी (Registration Fee)

 • दस्त नोंदणीसा ीच्या नोंदणी फी दराबाबत माहिती सांगा
   

  दस्त नोंदणीस दाखल केल्यांनतर त्या दस्तास नोंदणी फी तक्त्यानुसार नोंदणी फी आकारली जाते. सदर तक्ता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Fee Structure या िकाणी उपलब्ध आहे.

  काही प्रमुख दस्तांसा ीचे नोंदणी फी चे दर पुढीलप्रमाणे आहेत.
  अ.क्र. दस्त प्रकार नोंदणी फी
  1 स्थावर मालमत्तेची खरेदीखते, बक्षीसपत्रे, विकसनकरार, सदनिका अथवा जमीन इत्यादीचे विक्री करार/सा ेखत इ. दस्तातील मिळकतीचे बाजारमूल्य व मोबदला यापैकी जास्त असलेल्या रकमेवर प्रति रुपये 1000/- सा ी रुपये 10/- या दराने, कमीत कमी रुपये 100/- व जास्तीत जास्त रुपये 30,000/-
  2 गहाणखत दस्तात नमूद कर्ज रकमेवर प्रति रुपये 1000/- सा ी रुपये 10/- या दराने, कमीत कमी रुपये 100/- व जास्तीत जास्त रुपये 30,000/-
  3 लिव्ह अँन्ड लायसन्स
  (उदा- सदनिका 11 महिन्यांसा ी वापरासा ी देण्याचा करार.)
  अ) महानगरपालिका हददीतील मिळकतीसा ी रुपये 1000/- या निश्चित दराने.
  ब) उर्वरित क्षेत्रातील मिळकतीसा ी रुपये 500/- या निश्चित दराने.

 • नोंदणी फी कशी प्रदान करता येते ?
   

  नोंदणी फी शासनाच्या GRAS (Government Receipt and Accounting System) प्रणालीद्वारे ई-पेमेंट पध्दतीने, सर्वसाधारणपणे ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविण्याचे नियोजित आहे, त्या कार्यालयाचे नावाने अदा करता येते. रुपये 300/- पेक्षा कमी नोंदणी फी रोखीने देखील भरता येते. (ई-पेमेंट संदर्भात अधिक माहितीसा ी पहा-याच पुस्तकातील भाग- 5 : ई -पेमेंट)

 • दस्तास देय नोंदणी फी पूर्णपणे न भरल्यास दस्ताची नोंदणी नाकरली जाऊ शकते का ?
   

  होय. दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये दस्त नोंदणीस सादर करताना, त्या दस्तास आवश्यक असलेली पूर्ण नोंदणी फी भरणे आवश्यक आहे. अशी नोंदणी फी न भरल्यास, महाराष्ट्र नोंदणी नियम,1961 चे नियम 44 नुसार दुय्यम निबंधक दस्त नोंदणीस नाकारतात.
 • नोंदणी फी ची पावती कोणाच्या नावे देण्यात येते ?
   

  नोंदणी फी ची पावती ही ज्या पक्षकाराने दस्त नोंदणीस सादर केलेला आहे, त्या पक्षकाराचे (Presenter) नावे देण्यात येते.

 • नोंदणी फी भरण्याची जबाबदारी कोणाची असते ?
   

  नोंदणी फी भरण्याची जबाबदारी दस्त नोंदणीस सादर करण्या-या पक्षकाराची (Presenter) असते

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]