दस्ताचे मसुदे /ड्राफट

  • नोंदणी करावयाच्या कोणकोणत्या दस्तांचे मसुदे/ ड्राफट (Templates) नोंदणी व मुद्रांक विभागाकडे उपलब्ध आहेत? व ते को े उपलब्ध आहेत ?
     

    नोंदणी व मुद्रांक विभागाकडे उपलब्ध असलेल्या नोंदणी करावयाच्या दस्तांच्या मसुदयांची यादी व ते मसुदे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads या सदराखाली Draft Documents या िकाणी उपलब्ध आहेत.

  • नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या मसुदयानुसार दस्त तयार करणे बंधनकारक आहे का ?
     

    नाही. नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या दस्तांच्या मसुदयांचा वापर करणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. नागरिकांना स्वतःच्या व्यवहारासा ीचे दस्त स्वतः तयार करण्याची इच्छा असल्यास, सुलभ संदर्भ (Ready Reference) म्हणून वापरण्याकरीता विभागामार्फत सदर मसुदे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचा आधार घेवून व योग्य तो बदल करुन नागरिक स्वतःचा दस्त स्वतः तयार करु शकतात.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]