नोंदणीसा ी दस्त तयार करणे

 • एखादया दस्तामधील मजकुरात/लिखाणात खाडाखोड (Erasure), आंतरओळी (Interlineation) मोकळया जागा (Blank) व दुरुस्ती (Alteration) असल्यास त्या िकाणी निष्पादक पक्षकारांनी असा दस्त नोंदणीसा ी सादर करण्यापूर्वी काय करणे आवश्
   

  दस्तामधील मजकुरात/लिखाणात खाडाखोड (Erasure), आंतरओळी (Interlineation), मोकळया जागा (Blank) व दुरुस्ती (Alteration) असल्यास नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 20 नुसार अशा िकाणी सर्व निष्पादक पक्षकारांनी त्यांच्या सहया किंवा आदयाक्षरे (Initials) करणे आवश्यक आहे.

 • स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या दस्तांची नोंदणी करतांना दस्तामध्ये मिळकतीच्या तपशीलामध्ये/वर्णनामध्ये कोणत्या बाबी नमूद असणे दस्त नोंदणीसा ी आवश्यक आहेत?
   

  नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 21 नुसार स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या दस्ताच्या नोंदणीसा ी त्यामध्ये सदर मिळकत स्पष्टपणे ओळखता येईल, अशा रितीने मिळकतीचा तपशील नमूद असणे आवश्यक आहे. याकामी साधारणपणे पुढील बाबी दस्तात नमूद असणे आवश्यक आहे.

  1. दस्तातील मिळकत ही शहरातील घर (Houses in towns) असल्यास,

  अ. सदरचे घर हे ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्याचे नाव, रस्त्याच्या कोणत्या दिशेला आहे ती दिशा, तसेच त्या रस्त्यास क्रमांक दिला असल्यास त्याचा क्रमांक, घराचे क्षेत्रफळ व वापर.

  ब. सदरच्या घराचा सध्याचा तसेच असल्यास अगोदरच्या भोगवटाधारकाचे नाव.

  क. त्या मिळकतीचा सिटी सर्व्हे झालेला असल्यास, सिटी सर्व्हे क्रमांक (Cadastral Survey number /CTS)

  2. दस्तातील मिळकत ही शहराबाहेरील घर तसेच कोणत्याही िकाणची जमीन असल्यास,

  अ. वरील मिळकत ही ज्या भौगोलिक भागात आहे, त्या क्षेत्राचे नाव उदा- महसुली गाव/सजा, तालुक्याचे नाव

  ब. त्या मिळकतीचा सिटी सर्व्हे झालेला असल्यास, सिटी सर्व्हे क्रमांक (Cadastral Survey number /CTS)

  क. वरील मिळकत ही ज्या रस्ताच्या किंवा ज्या इतर मिळकतीच्या बाजूस स्थित आहे, त्या रस्त्याचे किंवा मिळकतीचे नाव किंवा क्रमांकाचा तपशील उदा- चतुःसीमा (चारही दिशांना
  असलेल्या मिळकती )

 • नोंदणी करावयाच्या दस्ताच्या कागदाचा आकार, शाई, फॉन्ट याबाबत काही नियम आहेत का ?
   

  याबाबत विशिष्ट असे नियम नाहीत. सर्वसाधारणपणे लिगल साईजच्या कागदावर काळया शाईने दस्त लिहिण्याची /टंकलिखित (Typing) / मुद्रित (Printing) करण्याची पध्दत आहे. मात्र लिहिलेला मजकूर सुवाच्य/ वाचनीय असावा.
 • दस्त कागदाच्या दोन्ही बाजूंवर लिहिला /टंकलिखीत (Typing) केला/मुद्रित(Printing) केला तर चालतो का?
   

  होय. दस्त कागदाच्या दोन्ही बाजूंवरच लिहीणे / टंकलिखीत करणे /मुद्रित करणे आवश्यक आहे. कागदाच्या दोनही बाजूवर दस्त लिहिला/टंकलिखित केला/ मुद्रित केला तर

  • दस्तासा ी कमी कागदाचा वापर होऊन पर्यावरणाची हानी टाळली जाते,
  • को-या बाजूच्या पेजींगसा ी लागणारा वेळ वाचतो,
  • स्कॅनिंगसा ी लागणारा वेळ वाचतो,
  • डेटा साईज कमी राहते,
  • प्रत्येक को-या बाजूसा ी प्रतिपान रुपये 20/- प्रमाणे दस्त हाताळणी शुल्काची बचत होते.

 • दस्त तयार करण्यासा ी व नोंदविण्यासा ी वकील (Advocate) किंवा दस्तलेखनिक (Bond Writer) यांची मदत घेणे आवश्यक आहे का ?
   

  नाही. नोंदणी अधिनियमात अशी कोणतीही तरतूद नाही.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]