मिळकतीच्या हक्कांबाबत पडताळणी

 • मिळकतीच्या हक्कांबाबत पडताळणी (Title Verification) करणे म्हणजे काय ?
   

  अ) एखादी मिळकत विक्री करु इच्छित असलेल्या / भाडेपट्टयाने देवू इच्छित असलेल्या अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्या मिळकतीची विल्हेवाट लावण्याचा व्यवहार करु इच्छित असलेल्या व्यक्तीस,
  तसा व्यवहार करण्याचे हक्क (Authority) खरोखरीच आहेत काय ?

  ब) त्या मिळकतीमध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही प्रकारे हक्क / हितसंबंध (Interest) निर्माण झालेला आहे काय ?

  क) त्या मिळकतीच्या मालकी हक्कांसंबंधात अथवा इतर संबंधात कोणताही वाद न्यायप्रविष्ट (Sub-Judice) आहे काय ? इत्यादी बाबींची चौकशी करणे म्हणजेच मिळकतीच्या हक्कांबाबत पडताळणी (Title Verification) करणे होय.

 • स्थावर मिळकतीच्या हस्तातंरणाच्या दस्ताची नोंदणी करताना मिळकतीच्या मालकी हक्कांची पडताळणी (Title Verification) दुय्यम निबंधक यांच्याकडून केली जाणे अभिप्रेत आहे का?
   

  नाही. मिळकत हस्तांतर करणा-या व्यक्तीला मिळकतीचे मालकी हक्क आहेत किंवा नाहीत याची पडताळणी दुय्यम निबंधक यांनी करण्याची तरतूद नोंदणी अधिनियम,1908 मध्ये अथवा इतर अधिनियमांमध्ये नाही. त्यामुळे स्थावर मिळकतीच्या हस्तातंरणाच्या दस्ताची नोंदणी करतांना त्या मिळकतीच्या मालकी हक्काची पडताळणी (Title Verification) दुय्यम निबंधक यांच्याकडून केली जात नाही. ही जबाबदारी व्यवहार करणा-या उभय पक्षांची असते

 • मिळकतीच्या मालकी हक्कांची पडताळणी (Title Verification) पक्षकारांनी का करावी ?
   

  मिळकतीच्या मालकी हक्कांची पडताळणी (Title Verification) पक्षकारांनी केल्यास,

  अ) व्यवहार करण्यास सक्षम नसलेल्या व्यक्तीबरोबर व्यवहार करण्यामुळे किंवा,

  ब) इतर व्यक्तीचा हक्क / हितसंबंध / बोजा असलेल्या मिळकतीमध्ये गुंतवणूक करण्यामुळे,किवा

  क) वाद न्यायप्रविष्ट असलेल्या मिळकतीमध्ये गुंतवणूक करण्यामुळे होणारी फसवणूक टाळली जावू शकते

 • मिळकतीच्या मालकी हक्कांच्या पडताळणीसा ी (Title Verification) कोणकोणते मार्ग आहेत ? त्यासा ी कोणते अभिलेख पहावेत ?
   

  मिळकतीच्या मालकी हक्कांच्या पडताळणीसा ी (Title Verification) सर्वसाधारणपणे खालील प्रमुख मार्ग आहेत.

  1. मागील काही वर्षांचे तसेच अदययावत 7/12 उतारे, फेरफार उतारे, मिळकत पत्रिका / सिटी सर्व्हे पत्रक (CTS Card) तपासणे.
  2. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये संबंधित मिळकतींच्या अनुषंगाने नोंदणी झालेल्या दस्तांची / दस्तांच्या सूचींची (Index) पाहणी करणे.
  3. नियोजित व्यवहारांबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहीर सूचना (Public Notice) प्रसिध्द् करुन हरकती मागविणे.
  4. नियोजित व्यवहारातील मिळकत ज्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होत आहे अशा न्यायालयामध्ये त्यासंबधात काही वाद न्यायप्रविष्ट आहेत का याबाबत न्यायालयाच्या अभिलेखांची पाहणी करणे.
  5. मिळकतीच्या मालकी हक्कांबाबत व ताब्याबाबत स्थानिक चौकशी करणे.
  6. मिळकत सहकारी गृहरचना संस्थेशी संबंधित असल्यास, त्या संस्थेकडे विचारणा करणे.

 • दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची व सूचींची पाहणी / शोध (Inspection / Search) घेणे म्हणजे काय ?
   

  एखादया मिळकती संदर्भात पूर्वी कोणत्या दस्ताची नोंदणी पूर्ण झाली आहे,याची दुय्यम निबंधक कार्यालयातील अभिलेखांची पाहणी करुन माहिती घेणे याला शोध (Inspection / Search) घेणे असे संबोधले जाते. हा शोध (Search) पुढील मार्गाने घेता येतो.

  अ) मिळकती संदर्भात नोंदणी झालेल्या दस्ताचा अनुक्रमांक/ वर्ष माहित असल्यास, त्या विशिष्ट दस्ताची / त्या दस्ताच्या सूची क्र. 2 ची पाहणी करणे (दस्त निहाय) किंवा

  ब) मिळकती संदर्भात नोंदणी झालेल्या दस्ताचा अनुक्रमांक/ वर्ष माहित नसल्यास-

  1. त्या विशिष्ट मिळकतीसंबधी नोंदणी झालेल्या सर्व दस्तांची/ त्या दस्तांच्या सूची 2 ची पाहणी करणे ( मिळकतनिहाय शोध) किंवा

  2. विशिष्ट व्यक्ती पक्षकार असलेल्या सर्व दस्तांची/ त्या दस्तांच्या सूची क्र.1 ची पाहणी करणे. (नावनिहाय शोध)

  यासंदर्भात सविस्तर माहितीसा ी पहा- याच पुस्तकातील "दस्त नोंदणी" या भागातील नोंदणी झालेल्या दस्तांच्या सूचींची पाहणी व शोध (Inspection / Search) हा उपविषय.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]