साक्षीदारांबाबत

 • साक्षीदार (Witness) म्हणजे काय ?
   

  दस्तावर पक्षकारांनी निष्पादन/सही (Execution/Sign) करतेवेळी समक्ष उपस्थित असणा-या व पक्षकारांनी असे निष्पादन त्यांच्यासमोर केल्याच्या पृष् यर्थ दस्तावर साक्षीदार म्हणून सही करणा-या व्यक्ती म्हणजे साक्षीदार होय. साक्षीदार म्हणजे दस्तातील पक्षकार नव्हेत किंवा दस्त नोंदणीच्या वेळीचे ओळखदार नव्हेत

 • दस्तावर सही करताना साक्षीदार (Witness) का आवश्यक असतात ?
   

  मालमत्ता हस्तांरण कायदा,1882 (Transfer of Property Act, 1882) व भारतीय सविंदा कायदा (Indian Contract Act) व तत्सम कायदयातील तरतुदींनुसार दस्ताचे निष्पादन विधीग्राहय / कायदेशीर होण्यासा ी दस्तावर सही करताना साक्षीदार (Witness) आवश्यक असतात.
 • कोणत्या दस्तास किती साक्षीदार आवश्यक असतात?
   

  खरेदीखत (Sale Deed), करारनामा (Agreement),भाडेपटटा (Lease Deed), गहाणखत (Mortgage Deed) अदलाबदल (Exchange Deed), बक्षीसपत्र (Gift Deed), वाटपपत्र (Partition Deed ) इत्यादी दस्तांच्या निष्पादनासा ी (पक्षकारांची दस्तावर सही होताना) किमान दोन साक्षीदार आवश्यक असतात. (प्रत्येक निष्पादन म्हणजे एकावेळी होणारे एक किंवा अनेक पक्षकाराचे निष्पादन)
 • या साक्षीदारांची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी वेळी उपस्थिती आवश्यक असते का ?
   

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]