आयकर कायदयातील तरतुदीं

 • दस्त नोंदणी करताना कोणत्या दस्तामध्ये PAN नमूद असणे अनिवार्य आहे ?
   

  आयकर अधिनियम,1961 चे कलम 139 व आयकर नियम,1962 चे नियम 114 नुसार रुपये 5 लाख व त्यापेक्षा वरील मूल्याच्या मिळकतीच्या खरेदी-विक्री/हस्तांतरणाच्या दस्तामध्ये लिहून देणार व लिहून घेणार यांचे आयकर विभागाचे PAN (स्थायी खाते क्रमांक) नमूद करणे आवश्यक आहे. तसेच PAN कार्डची सुस्पष्ट व वाचनीय प्रत अशा दस्तासोबत जोडणे देखील आवश्यक आहे.
 • अशा दस्ताची नोंदणी करताना दस्तातील संबंधित पक्षकारांकडे PAN नसेल तर काय करावे?
   

  आयकर नियम, 1962 चे नियम 114 मध्ये नमूद केल्यानुसार, अशा दस्तातील संबंधित पक्षकारांकडे PAN (स्थायी खाते क्रमांक) नसेल तर,

  1. ज्या पक्षकारांनी रोखीने व्यवहार केलेला आहे, त्या पक्षकारांनी नमुना 60 प्रमाणे व
  2. केवळ शेती उत्पन असणा-या व करपात्र इतर कोणतेही उत्पन्न नसणा-या पक्षकारांनी नमुना 61 मध्ये घोषणापत्र दस्तासोबत जोडणे आवश्यक आहे.

  सदर नमुने (Forms) नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads या सदराखाली Forms या िकाणी उपलब्ध आहेत.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]