दस्त नोंदणीसा ी आवश्यक पूरक कागदपत्रे

 • दस्त नोंदणीसा ी सर्वसाधारणपणे दस्त प्रकारनिहाय आवश्यक कागदपत्रे कोणती ?
   

  सर्वसाधारणपणे दस्त प्रकारनिहाय आवश्यक कागदपत्रांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Activities या सदराखाली Document Registration या िकाणी उपलब्ध आहे.

 • दस्त नोंदणी संदर्भात नोंदणी नियम 44 (आय) म्हणजे काय ?
   

  महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम 44 मध्ये दस्त नोंदणीपूर्वी दुय्यम निबंधकानी कोणकोणत्या बाबींची खातरजमा करावी याची तरतूद आहे. त्यामध्ये बाब (आय) पुढीलप्रमाणे आहे.
  ' त्या दस्ताद्वारे उददेशित असणा-या व्यवहाराबाबत केंद्र शासन व राज्य शासन यांच्या एखादया कायदयान्वये निर्बंध असेल तर त्या कायद्यान्वये, नियुक्त सक्षम प्रधिकारी यांचेकडील परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्राची सत्य प्रत दस्तासोबत जोडलेली आहे व त्या परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्रातील नमूद कोणत्याही प्राणभूत अटी व शर्तींशी विसंगत रितीने दस्त लिहीलेला नाही '

  याचा साधारण अर्थ असा की, एखादया प्रकारच्या व्यवहारावर कोणत्याही कायदयाने बंदी अथवा निर्बंध असेल तर त्या प्रकारच्या व्यवहारासा ी तयार करण्यात आलेल्या दस्ताची नोंदणी संबंधित कायदयाद्वारे नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिका-याची परवानगी/ना हरकत प्रमाणपत्र दस्तासोबत जोडले असल्याशिवाय करता येत नाही.

 • महाराष्ट्र नोंदणी नियम, 1961 चे नियम 44 मध्ये सदर बाब (आय) केव्हापासून अस्तित्वात आली आहे ?
   

  महाराष्ट्र नोंदणी नियम, 1961 चे नियम 44 मध्ये सदर बाब (आय) दि.01/07/2006 पासून अंमलात आली आहे.

 • स्थावर मिळकतीच्या व्यवहारावर प्रतिबंधात्मक तरतुदी असणारे प्रचलित कायदे कोणते आहेत ?
   

  स्थावर मिळकतीच्या व्यवहारावर प्रतिबंधात्मक तरतुदी असणा-या काही प्रमुख प्रचलित कायदयांची यादी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या दि. 23/08/2006 रोजीच्या परिपत्रकासोबत उपलब्ध आहे. सदर परिपत्रक नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circular या िकाणी उपलब्ध आहे

 • तुकडेबंदी कायदयान्वये कोणत्या मिळकतीचे हस्तांतरणावर कोणते बंधन आहे ?
   

  1. महाराष्ट्र जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 चे कलम 3 नुसार घोषित केलेल्या स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किंवा विभागणी तुकडा निर्माण होईल अशा रितीने करता येणार नाही असे बंधन या कायदयाचे कलम 8 अन्वये आहे.
  2. तुकडा म्हणजे त्या त्या स्थानिक क्षेत्रासा ी रवून देण्यात आलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा (Standard Area) कमी विस्ताराचा (क्षेत्रफळाचा) जमीनीचा तुकडा.
  3. राज्यातील वेगवेगळी स्थानिक क्षेत्रे व त्यांच्यासा ी रविण्यात आलेली प्रमाणभूत क्षेत्रे यांचा तपशील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Notifications या िकाणी उपलब्ध आहे.

 • बिगर शेतकरी व्यक्तीस शेतजमीन घ्यावयाची असेल तर कोणती परवानगी आवश्यक असते ?
   

  महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 (Maharashtra Tenancy & Agricultuaral land Act) च्या कलम 63, हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,1950 चे कलम 47 व मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम 1958 चे कलम 47 नुसार हे कायदे लागू असतील त्या प्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे बिगर शेतकरी व्यक्तीस शेतजमीन स्वत:चे लाभात हस्तांतरित करुन घ्यावयाची असेल तर जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या प्राधिका-याची पूर्वपरवानगी आवश्यक असते

 • आदिवासी व्यक्तीच्या मिळकतीच्या वहिवाटीच्या अधिकारांच्या हस्तांतरणावर कोणते बंधन आहे?
   

  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चे कलम 36 व 36 अ नुसार आदिवासी व्यक्तीच्या मिळकतीच्या वहिवाटीचे अधिकाराचे बिगर आदिवासी व्यक्तीच्या लाभात विक्री,बक्षीस,अदलाबदल,
  गहाण, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय व जिल्हाधिका-यांच्या मंजुरी आदेशाशिवाय प्रतिबंधित आहे.

  वरीलप्रमाणे हस्तांतरणावर बंधन असल्याने आदिवासी व्यक्तीच्या मिळकतीच्या वहिवाटीचे बिगर आदिवासी व्यक्तीच्या लाभातील विक्रीपत्र, बक्षीसपत्र, अदलाबदल, गहाणखत, भाडेपट्टा, विकसन करारनामे व कुलमुखत्यारपत्र इत्यादी दस्तांची नोंदणी राज्य शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय व जिल्हाधिका-यांच्या मंजुरीशिवाय नोंदणी नियम, 1961 चे नियम 44 (आय) नुसार करता येणार नाही.

  या संदर्भातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाची परिपत्रके दि 23/8/2006 व दि 25/3/2013 नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Circulars या िकाणी उपलब्ध आहेत

 • सदनिकेची पुन्हा विक्री (Resale) करताना करावयाच्या दस्त नोंदणीसा ी सहकारी गृहरचना संस्थेचे किंवा बिल्डरचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे का ?
   

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]