सवर्वसाधारण माहीती

 • दस्त नोंदणी (Document Registration )म्हणजे काय ?
   

  दस्त नोंदणी करण्याचा सर्वसाधारण अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल-

  • पक्षकारांनी त्यांच्या व्यवहाराचा लिखित व सही केलेला दस्त दुय्यम निबंधक यांचेसमोर हजर करणे (Presentation) व
  • सदर दस्तावर सही केली असल्याचे त्यांनी स्वेच्छेने कबूल करणे (Admission) व
  • अशी कबुली देणारी व्यक्ती खरोखरीच तीच आहे व त्याने त्या दस्तावर सही केली आहे, याची दुय्यम निबंधक यांनी खातरजमा करणे (Identification)व
  • याप्रमाणे पूर्तता झाल्याची नोंद दस्तावर घेवून, दस्त नोंदणी केला असे दुय्यम निबंधक यांनी प्रमाणित करणे (Registration) व
  • याप्रमाणे पूर्तता झालेला दस्त, नोंदणी पुस्तकामध्ये अभिलिखित करणे (Copying) तसेच त्या दस्ताचा गोषवारा नमूद असलेली सूची (Index) तयार करणे.


  थोडक्यात, दस्त नोंदणी करणे म्हणजे दस्तावर संबंधितांनी स्वत: जाणीव ेवून सही केली असल्याची दुय्यम निबंधकानी खात्री करणे व तसे प्रमाणित करुन दस्त शासकीय अभिलेखात समाविष्ट करुन घेणे. तसेच दस्तामध्ये नमूद व्यवहाराची माहिती / नोटीस तमाम जनतेला माहितीसा ी उपलब्ध करुन देणे आणि त्याद्वारे व्यवहार करणा-यांचे हित संर॑क्षित करणे असाही सर्वसाधारण अर्थ सांगता येतो.

  दस्त नोंदणीची कार्यवाही नोंदणी अधिनियम, 1908 या कायदयान्वये केली जाते. या कायदयातील तरतुदींच्या अनुषंगाने दस्त नोंदणीची सविस्तर कार्यपध्दती महाराष्ट्र नोंदणी नियम,1961 अन्वये रवून देण्यात आलेली आहे.

 • इच्छित व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी साधारणपणे कोणत्या गोष्टींची पडताळणी / खातरजमा करणे अपेक्षित आहे ?
   

  या प्रश्नाचे उत्तर व्यवहाराचे स्वरुप, संबंधित मिळकतीचे स्थान व प्रकार इत्यादी निकषांवर अवलंबून असते. मात्र दस्त नोंदणीच्या अनुषंगाने विचार करता, साधारणपणे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी किमान पुढील बाबींची खातरजमा करणे अपेक्षित आहे.

  1. 1.ज्या मिळकतीचा व्यवहार करावयाचा आहे, त्या मिळकतीच्या मालकी हक्काची (Title) पडताळणी करावी.
  2. 2.व्यवहार मूळ मालकाऐवजी त्याच्या मुखत्यारपत्रधारकाबरोबर (Power of Attorney Holder) होत असेल तर, त्याच्याकडील मुखत्यारपत्राची सत्यता/वैधता तपासावी व त्या मुखत्यारपत्रामध्ये संबंधित मिळकतीबाबत व्यवहार करण्याचे स्पष्ट अधिकार संबंधित मुखत्यारपत्रधारकास दिलेले आहेत याची खात्री करावी.
  3. ३.नियोजित व्यवहार राज्यामध्ये प्रचलित कोणत्याही कायदयान्वये प्रतिबंधित नाही याची खातरजमा करावी. कारण नियोजित व्यवहार राज्यामध्ये प्रचलित कोणत्याही कायदयान्वये प्रतिबंधित असेल तर, त्या व्यवहारासा ीच्या दस्ताची नोंदणी होणार नाही.
 • दस्त नोंदणीसा ी पक्षकारांनी कोणती पूर्वतयारी करणे आवश्यक असते ?
   

  दस्त नोंदणीसा ी पक्षकारांनी साधारण खालीलप्रमाणे पूर्वतयारी करणे आवश्यक असते.

  1. व्यवहाराच्या अनुषंगाने दस्त तयार करणे. (लिहीणे)
  2. दस्त नोंदणीसा ी दस्त प्रकारानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे, परवानग्या संकलित करणे.
  3. जर दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्क मिळकतीच्या बाजारमूल्यावर अवलंबून असेल (उदा. खरेदीखत) तर त्या मिळकतीचे मूल्यांकन तपासून घेणे.
  4. दस्तास मुद्रांक अधिनियमानुसार देय असणारे मुद्रांक शुल्क भरणे.
  5. देय नोंदणी फी भरण्याची पूर्वतयारी करणे.
  6. दस्तावर साक्षीदारांसमोर सहया/निष्पादन (Execution) करणे.
  7. उपरोक्त प्रमाणे पूर्तता केल्यांनतर, दस्त नोंदणीसा ीचा वेळ वाचविण्यासा ी विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या पुढील पर्यायांचा वापर पक्षकार करु शकतात.
   अ) दस्त नोंदणीसा ी आवश्यक असणारी दस्ताची माहिती पब्लिक डाटा एंट्रीद्वारे संगणकावर ऑनलाईन भरणे.
   ब) ई-स्टेप इन या सुविधेद्वारे दस्त नोंदणीसा ी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ आरक्षित करणे.
  8. दस्तावर सही केल्यानंतर तो चार महिन्यांच्या आत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसा ी सादर करणे आवश्यक आहे.
 • दस्त निष्पादित (Execute) करणे म्हणजे काय ?
   

  दस्ताचे स्वरुप, त्यातील नमूद विषय/मजकूर/तपशील (अटी व शर्ती) पाहून, वाचून व समजावून घेतल्यानंतर त्यावर संबंधित पक्षकाराने दिनांकीत सही करणे, म्हणजे दस्त निष्पादित (Execute) करणे, असा साधारण अर्थ नोंदणी प्रयोजनार्थ सांगता येईल.

 • दस्त नोंदणीसा ी दुय्यम निबंधक कार्यालयात कोणकोणती कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक आहे?
   

  दस्त नोंदणीसा ी दुय्यम निबंधक कार्यालयात जाताना पुढील कागदपत्रे सोबत नेणे आवश्यक असते.

  1) योग्य मुद्रांक शुल्क भरलेला व सर्व पक्षकारांनी सहया केलेला मूळ दस्त,

  2) ई-पेमेंट द्वारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरलेली असल्यास त्यासा ीचा पुरावा,

  3) दस्ताच्या कबुलीजबाबासा ी हजर राहणा-या सर्व पक्षकारांची छायाचित्र असलेली ओळखपत्रे,

  4) ओळख पटविणा-या व्यक्ती व त्यांची छायाचित्र असलेली ओळखपत्रे,

  5) दस्त प्रकारानुसार आवश्यक पूरक कागदपत्रे,

  6) नोंदणी करावयाच्या दस्ताच्या प्रति पान रुपये 20/- या दराने रोखीने भरावयाची दस्त हाताळणी शुल्काची रक्कम,

  7) दस्त कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कुलमुखत्यारधारकाने निष्पादित केला असेल किंवा कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मूळ मालकाच्या वतीने दस्त नोंदणीस सादर करण्यात येत असेल किंवा कबुलीजबाब देण्यात येत असेल तर अशा अधिकाराचे मूळ मुखत्यारपत्र, त्याची सत्य प्रत व कुलमुखत्यारपत्र अस्तित्वात (अंमलात) असल्याबाबतचे विहित नमुन्यातील घोषणापत्र,

  8) जर पब्लिक डाटा एन्ट्री पर्यायाचा वापर करण्यात आला असेल तर त्याद्वारे प्राप्त 11 अंकी सांकेतांक व नोंदणीपूर्व गोषवा-याची प्रिंट जर पब्लिक डाटा एन्ट्री केली नसेल तर दस्ताची माहिती नमूद केलेला इनपुट फॉर्म व दुय्यम निबंधक कार्यालयात रोखीने भरावयाच्या प्रति पान रुपये 20/- प्रमाणे डाटा एंट्री शुल्काची रक्कम.

  9) जर ई-स्टेप इन द्वारे वेळ आरक्षित केली असेल तर त्याची पावती.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]