जन माहीती अधिकारी

 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयांमार्फत जनतेला दिल्या जाणा-या सेवा संदर्भात विभागाने तयार केलेली नागरिकांची सनद को े उपलब्ध होईल ?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयांमार्फत जनतेला दिल्या जाणा-या सेवा संदर्भात विभागाने तयार केलेली नागरीकांची सनद, नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये पहाणीसा ी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ती सनद नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Citizen Areaयासदराखाली Citizen’s Charter या िकाणी उपलब्ध आहे.
 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयांमध्ये जन माहिती अधिकारी कोण आहेत व त्यांचे अपीलिय प्राधिकारी कोण आहेत?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयांमध्ये जन माहिती अधिकारी व त्यांचे अपीलिय प्राधिकारी यासंबंधातील आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाच्या wwwigrmaharashtragov.inया संकतेस्थळावर CitizenAreaया सदराखाली RTIया िकाणी उपलब्ध आहेत.त्याचा गोषवारा याप्रमाणे.
  अ.क्र. कार्यालय जन माहिती अधिकारी अपीलिय प्राधिकारी
  1 दुय्यम निबंधक संबंधित दुय्यम निबंधक संबंधित जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक
  2 विवाह अधिकारी संबंधित विवाह अधिकारी संबंधित जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक
  3 सह जिल्हा निबंधक संबंधित कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व सह जिल्हा निबंधक वर्ग 2 संबंधित जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक
  4 नोंदणी उपमहानिरीक्षक संबंधित कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व सह जिल्हा निबंधक वर्ग 2 संबंधित नोंदणी उपमहानिरीक्षक
  5 नोंदणी महानिरीक्षक सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक व कार्यासन अधिकारी,क्र.9 नोंदणी उपमहानिरीक्षक(मुख्यालय)
  6 प्रधान मुद्रांक कार्यालय मुद्रांक अधीक्षक अपर मुद्रांक नियंत्रक
  7 शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे प्रशासकीय अधिकारी वर्ग 2 व्यवस्थापक, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे
  8 मुंबई विभागातील मुद्रांक जिल्हाधिकारी संबंधित कार्यालयातील दुय्यम निबंधक,श्रेणी1 संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी
  9 उप संचालक /सहाय्यक संचालक,नगररचना मूल्यांकन संबंधित उप संचालक /सहाय्यक संचालक,नगररचना, मूल्यांकन सह संचालक,नगररचना, मूल्यांकन,महाराष्ट्र राज्य,पुणे
  10 सह संचालक,नगररचना, मूल्यांकन,महाराष्ट्र राज्य,पुणे नगररचनाकार सह संचालक,नगररचना, मूल्यांकन,महाराष्ट्र राज्य,पुणे

  या सर्व कार्यालयांचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी,ई-मेल आयडी व पत्ते यांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आर्गेनाईजेशन या सदराखाली Officesया िकाणी उपलब्ध आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]