नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, महाराष्ट्र राज्य,पुणे

 • नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचा पत्ता, संपर्कासा ी दूरध्वनी क्रमांक व ई मेल आयडी कोणता आहे ?
   

  नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाचा

  पत्ता- नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला,विधानभवन समोर,
  पुणे 4110001 संपर्कासा ी दूरध्वनी क्रमांक – 02026124012


  ईमेल आयडी- तक्रारीसा ी – compliant@igrmaharashtra.gov.in

  सूचनेसा ी- feedback @igrmaharashtra.gov.in

 • नोंदणी महानिरीक्षक कार्यालयामध्ये कोणत्या स्वरुपाचे कामकाज चालते?
   

  नोंदणी महानिरीक्षक हे राज्यातील दस्त नोंदणी यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे मुद्रांक अधिनियमान्वये मुख्य नियंत्रक महसूल प्रधिकारी (Chief Controlling Revenue Authority)आहेत.

  1. या कार्यालयाकडून राज्यातील दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी उपमहानिरीक्षक व नगररचना (मूल्यांकन) कार्यालयांवर प्रशासकीय नियंत्रण ेवणे.
  2. मुद्रांक शुल्क व नोंदणी फी च्या स्वरुपात महसूल संकलनावर नियंत्रण करणे.
  3. मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्कासदंर्भात दिलेल्या निर्णयाविरुध्दची अपीले व रिव्हीजन केसेस चालविणे
  4. मुद्रांक परताव्याबाबत रुपये 10 लाखाच्या वरील रकमेच्या परतावा मागणी प्रकरणांना मंजूरी देणे.
  5. नोंदणी अधिनियमाच्या अंमलबजावणीसा ी नियम तयार करणे. नोंदणी अधिनियमामध्ये व मुद्रांक अधिनियमामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा सुचविणे.
  6. महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम,1998 अन्वये राज्यासा ी विवाह महानिबंधक म्हणून काम करणे.

  अशा स्वरुपाचे कामकाज पार पाडले जाते.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]