शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे

 • शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे या कार्यालयातील कामकाजाचे स्वरूप कसे आहे ?
   

  नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार, नोंदणी झालेल्या दस्तांची प्रतिलिपी (कॉपी) दुय्यम निबंधक कार्यालयातील संबधित नोंदणी पुस्तकामध्ये ेवून जतन करावी लागते. प्रतिलिपी (कॉपी) करण्यासा ी सुरुवातीला हस्तलेखनाची पध्दत होती. तदनंतर सन 1930 पासून, छायाचित्रण (Photography) पध्दत सुरु झाली.
  या पध्दतीमध्ये, दस्तांची नोंदणी झाल्यांनतर, मूळ दस्त शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे येथे छायाचित्रणासा ी पा विले जात होते. त्या कार्यालयात दस्ताचे छायाचित्रण पूर्ण झाल्यांनतर मूळ दस्त व त्याची फोटोप्रींट संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडे पा विली जात होती. तदनंतर असा मूळ दस्त दुय्यम निबंधक कार्यालयांकडुन संबंधित पक्षकारांना परत दिला जात होता.
  शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे कार्यालयात अशा छायाचित्रित केलेल्या दस्तांच्या निगेटीव्ह प्रींटस कायमस्वरुपी जतन केलेल्या आहेत.
  तथापि, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे येथे साधारण पणे 1985 नंतरच्या दस्तऐवजांच्या बाबतीत, छायाचित्रण करण्याऐवजी स्कॅनिंग करणेची कार्यवाही सन 2003 ते सन 2007 दरम्यान पूर्ण करण्यात आलेली आहे.

 • शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे येथून जुने दस्त अथवा त्यांच्या नकला नागरिकांना थेट उपलब्ध होतात का?
   

  शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय,पुणे येथून पक्षकारांना मूळ दस्त/नकला दिल्या जात नाहीत. ज्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसा ी दाखल करण्यात आला आहे, अशा दुय्यम निबंधक कार्यालयातूनच मूळ दस्त/नकला नागरिकांना दिल्या जातात. त्यामुळे त्याकामी नागरिकांनी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयातच अर्ज करणे आवश्यक आहे.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]