प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई (General Stamp office)

 • प्रधान मुद्रांक कार्यालय को े कार्यरत आहे?
   

  प्रधान मुद्रांक कार्यालय हे मुंबई येथे टाउन हॉल, एशियाटीक लायब्ररी इमारत, फोर्ट, मुंबई 400 001 येथे कार्यरत आहे.
 • प्रधान मुद्रांक कार्यालयात कोणत्या स्वरुपाचे कामकाज चालते?
   

  अपर मुद्रांक नियंत्रक,मुंबई हे प्रधान मुद्रांक कार्यालयाचे प्रमुख असतात.

  प्रधान मुद्रांक कार्यालयाकडुन प्रामुख्याने पुढील कामकाज केले जाते.

  1. मुंबई विभागातील, मुद्रांक जिल्हाधिकारी – (मुंबई शहर, अंधेरी,बोरीवली, कुर्ला , अमंलबजावणी 1 व अंमजबजावणी 2 यांचे कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण ेवणे.
  2. मुद्रांक परताव्याबाबत रुपये 1 लाखावरील व 10 लाखापर्यंतचे परतावा
  3. मागणी प्रकरणांना मंजुरी देणे.
  4. मद्रांक जिल्हाधिकारी यांनी मुद्रांक शुल्क आकारणी करतांना, निश्चित केलेले बाजारमूल्य पक्षकारांना मान्य नसल्यास,त्याविरुध्दचे अपील चालविणे.
  5. पारंपारीक मुद्रांकाची (मुद्रांक कागद व चिकट मुद्रांक) सिक्युरीटी प्रेस,नाशिक/हैद्राबाद येथे राज्यासा ी मागणी नोंदविणे व सा ा प्राप्त करुन त्याचा मागणीप्रमाणे सर्व जिल्हा कोषागारांना पुरव ा करणे.
 • राज्यात मुद्रांक कागदाची (Stamp paper) मागणी, पुरव ा, वितरण व विक्रीसा ी कोणती व्यवस्था आहे?
   

  राज्यात पारपांरीक पध्दतीचे मुद्रांक (मुद्रांक कागद व चिकट मुद्रांक) यांचे मागणी,पुरव ा, वितरण व विक्रीसा ी पुढीलप्रमाणे व्यवस्था आहे-

  1. राज्याचे सर्व जिल्हयांतील कोषागार कार्यालयांकडुन मुद्रांकांबाबत मागणीपत्र प्रधान मुद्रांक कार्यालयात पा विली जातात.
  2. सदर मागणीनुसार, राज्यासा ी आवश्यक असलेल्या मुद्रांकांची मागणी सिक्युरीटी प्रेस,नाशिक/हैद्राबाद येथे नोंदविली जाते.
  3. प्रधान मुद्रांक कार्यालयाने नोंदविलेल्या मागणीनुसार, सिक्युरीटी प्रेस, नाशिक/हैद्राबाद कडून प्रधान मुद्रांक कार्यालयास मुदांकांचा पुरव ा केला जातो.
  4. त्यानंतर प्रधान मुद्रांक कार्यालयांकडून जिल्हा कोषागारांच्या मागणीनूसार, संबंधित कोषागारांना मुद्रांकांचे वितरण केले जाते.
  5. संबंधित कोषागार कार्यालय अशा प्राप्त झालेल्या मुद्रांकांची थेट पक्षकारांना विक्री करतात. त्याचबरोबर मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांकांचा पुरव ा करतात.
  6. परवानाधारक मुद्रांक विक्रेते अशा प्राप्त झालेल्या मुद्रांकांची जनतेस त्यांच्या मागणीप्रमाणे, परंतु विहीत मर्यादेत विक्री करतात.
  7. मुंबई विभागामध्ये, मुद्रांक विक्रेत्यांना मुद्रांकांचा पुरव ा करण्याचे काम प्रधान मुद्रांक कार्यालयामार्फतच केले जाते
 • मुंबईमध्ये नागरिकांना मुद्रांक कागद किंवा चिकट मुद्रांक कोणकोणत्या केद्रांवर उपलब्ध होउ शकतात?
   

  मुंबईमध्ये नागरिकांना मुद्रांक कागद किंवा चिकट मुद्रांक खालील केद्रांवर उपलब्ध होउ शकतात-
  अ.क्र. मुद्रांकाचा प्रकार मुद्रांक विक्रीची केंद्रे
  1 न्यायिकेतर मुद्रांक पेपर
  1. परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याद्वारे(यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
  2 न्यायिक मुद्रांक पेपर व न्यायालयीन चिकट मुद्रांक (Labels)
  1. प्रधान मुद्रांक कार्यालयातील खिडकी क्रमांक 13 वर.
  2. उच्च न्यायालय मुंबई आवारामध्ये असलेल्या प्रधान मुद्रांक कार्यालयाच्या विक्री केंद्रांमध्ये
  3. परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडे (रूपये 3000/ पर्यंत)
  3 इंशुरन्स स्टॅम्पस(रूपये 100/- पर्यंत) नोटरीयल स्टॅम्पस व भारतीय महसूल मुद्रांक (Revenue Stamps)
  1. प्रधान मुद्रांक कार्यालयातील खिडकी क्रमांक 13 वर.
  4 गॅस एजन्सीच्या करारासा ी लागणारे विशेष चिकट मुदांक
  1. प्रधान मुद्रांक कार्यालयातील खिडकी क्रमांक 12 वर
  5 1.बिल ऑफ एक्सचेंज 2. डिबेंचर्स 3. प्रॉमिसरी नोटस 4. लेटर ऑफ क्रेडिट 5. इंशुरन्स डॉक्युमेंटस यासा ीची रक्कम GRAS प्रणालीद्वारे ऑनलाईन भरल्यानंतर प्रधान मुद्रांक कार्यालयात फ्रॅकींग करुन दिले जाते.(रुपये 5000/- च्या मर्यादेत)
  6 शेअर ट्रान्सफर बीओआय शेअर होल्डींग्ज लि. यांचेकडुन रुपये 5000/- च्या मर्यादेत फ्रॅकीगद्वारे

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]