नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालये

 • राज्यात नोंदणी व मुद्रांक विभागाचे किती प्रादेशिक विभाग आहेत, त्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत ?
   

  राज्यात नोंदणी व मुद्रांक विभागाचे एकूण 8 प्रादेशिक विभाग आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-
  अ.क्र.
  विभाग समाविष्ट� जिल्हे
  1 मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगर
  2 पुणे पुणे ,सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर
  3 �� ाणे �� ाणे, (पालघरसह),रायगड, रत्नागिरी,‍ सिंधुदुर्ग
  4 नाशिक नाशिक,अहमदनगर,जळगाव,व धुळे (नंदुरबारसह)
  5 औरगाबाद औरगाबाद, बीड व जालना
  6 नागपूर नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली,भंडारा (गोदीयासह)
  7 अमरावती अमरावती,यवतमाळ,बुलढाणा व अकोला (वाशिमसह)
  8 लातूर लातूर,नांदेड, उस्मानाबाद व परभणी (हिंगोलीसह)

 • प्रादेशिक स्तरावरील नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांची नावे, पत्ते, दूरध्वनी, ई मेल आयडी याची माहिती को�� े उपलब्ध होईल ?
   

  प्रादेशिक स्तरावरील नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांची नावे, पत्ते, दूरध्वनी व ई मेल आयडी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisationया सदराखाली Officesया �� िकाणी उपलब्ध आहेत.
 • नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयांमध्ये कोणत्या स्वरुपाचे कामकाज चालते?
   

  • नोंदणी उपमहानिरीक्षक हे त्या प्रादेशिक विभागाकरीता विभाग प्रमुख म्हणून काम करतात.
  • प्रादेशिक विभागातील सह जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण नोंदणी उपमहानिरीक्षकांकडुन ेवले जाते. सह जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजाच्या तपासण्या नोंदणी उपमहानिरीक्षकांकडुन केल्या जातात.
  • मुंबई वगळता, उर्वरीत प्रादेशिक विभागांचे नोंदणी उपमहानिरीक्षक हे त्या त्या प्रादेशिक विभागाकरीता मुद्रांक उपनियंत्रक म्हणून देखील काम करतात व त्या अधिकारात खालील कामे पार पाडतात.
  1. मुद्रांक परताव्याबाबत रुपये 1 लाखावरील व 10 लाखापर्यंतचे परतावा मागणी प्रकरणांना मंजुरी देणे.
  2. मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी मुद्रांक शुल्क आकारणी करतांना, निश्चित केलेले बाजारमूल्य पक्षकारांना मान्य नसल्यास,त्याविरुध्दचे अपील चालविणे.
  • मुंबई विभागामध्ये,मुद्रांक उपनियंत्रक पदाचे कामकाज अपर मुद्रांक नियंत्रक यांचेकडुन पार पाडले जाते.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]