मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये Office of the Collector of Stamps

 • मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांमधून चालणा-या कामकाजाचे स्वरूप कसे आहे ?
   

  मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांमधून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार पुढील प्रकारचे कामकाज चालते-

  1. दस्तास किती मुद्रांक शुल्क देय आहे याबाबत अभिनिर्णय देणे
  2. कमी पडलेल्या मुद्रांक शुल्काची दंडासह वसूली करणे
  3. या प्रयोजनासा ी आवश्यक असल्यास मिळकतीचे बाजारमूल्य निश्चित करणे
  4. मुद्रांक शुल्काचा परतावा देणे इत्यादी.
  5. चुकविलेल्या मुद्रांकाचा शोध घेणे.
  परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांवर नियंत्रण ेवणे.
 • राज्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी, ई मेल आयडी व पत्ते याबाबतची माहिती को े उपलब्ध होईल ?
   

  राज्यातील सह जिल्हा निबंधक यांनाच त्या त्या कार्यक्षेत्रासा ी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता) मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.
  मात्र, मुंबई शहर जिल्हयासा ी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय आहे, तर मुंबई उपनगर जिल्हयामधील अंधेरी,बोरीवली व कुर्ला या तीन तालुक्यांसा ी मुद्रांक जिल्हाधिकारी अंधेरी, बोरीवली व कुर्ला ही तीन स्वतंत्र कार्यालये कार्यरत आहेत.
  या सर्व कार्यालयांचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी, ई मेल आयडी व पत्ते यांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisationया सदराखाली Officesया िकाणी उपलब्ध आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]