दुय्यम निबंधक कार्यालये ( Offices of the Sub Registrar)

 • नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयांमधून चालणा-या कामकाजाचे स्वरूप कसे असते ?
   

   दुय्यम निबंधक कार्यालयांमधून नोंदणी अधिनियम, १९०८ अन्वये खालीलप्रमाणे कामकाज पार पाडले जाते.
  • दस्तांची नोंदणी करणे
  • नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रतिलिपी (Copy) तयार करुन जतन करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे.
  • नोंदणी केलेल्या दस्तांच्या सूची (Index) तयार करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे.
  • नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रती व सूची मागणीनुसार पाहणीसा�� ी व व्यवहारांचा शोध घेण्यासा�� ी (Inspection & Search ) उपलब्ध करुन देणे.
  • नोंदणी केलेल्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या दस्तांची माहिती, मिळकत अभिलेखात (७/१२ व मिळकत पत्रिका) फेरफार घेण्यासा�� ी संबंधित यंत्रणकडे पा�� विणे

  सदर सर्व कामकाज मध्यवर्ती दस्त नोंदणी प्रणालीच्या सहाय्याने पार पाडले जाते.

 • दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसा�� ीच्या संगणकीकृत प्रणालीची अंमलबजावणी कशा रितीने करण्यात आली आहे ?
   

  • नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसा�� ी संगणकीकृत प्रणालीचा वापर सन 2002 पासून करण्यात आला आहे. त्या प्रणालीस सरीता SARITAअसे संबोधले जात होते.
  • सन 2012 पासून, वापरात आलेल्या आय-सरीता(i-SARITA) या संगणकीकृत प्रणालीमध्ये राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये MPLSVPNकनेक्टीव्हीटीद्वारे मध्यवर्ती सर्व्हरशी जोडण्यात आली आहेत व दस्त नोंदणी करतेवेळीच दस्ताची सर्व माहिती व स्कॅन्ड इमेज सह मध्यवर्ती सर्व्हरवर पा�� विण्यात येते.
  • दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसा�� ीच्या संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणालीची अंमलबजावणी खाजगी संस्थेच्या सहभागाच्या तत्वावर करण्यात आली आहे.
  • यामध्ये,संबंधीत खाजगी संस्थेवर दुय्यम निबंधक कार्यालयास MPLSVPN कनेक्टीवीटी पुरविणे, मनुष्यबळ पुरविणे, आवश्यक स्टेशनरी पुरविणे आणि हार्डवेअरची निगा राखणे इत्यादी जबाबदा-या सोपविण्यात आलेल्या आहेत.
 • दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधक व त्यांचे कर्मचारी आणि संगणक ऑपरेटर्स यांचेमध्ये कामकाजाची विभागणी साधारण कशी आहे.?
   

  दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करण्यासा�� ी संगणकीकृत प्रणाली (i-SARITA) खाजगी संस्थेच्या सहभागाच्या तत्वावर (BOT)राबविण्यात आलेली आहे.यामध्ये, दस्त नोंदणी संदर्भातील सर्व वैधानिक आणि प्रशासकीय कामकाज दुय्यम निबंधक आणि त्यांचे कर्मचारी यांचेकडून पार पाडले जाते.
  खाजगी संस्थेकडून नियुक्त करण्यात आलेले संगणक ऑपरेटर्स यांना दस्त नोंदणी प्रकीयेत कोणतेही वैधानिक अथवा प्रशासकीय कामकाज सोपविण्यात आलेले नाही. खाजगी संस्थेच्या संगणक ऑपरेटर्स यांनी केवळ दस्त नोंदणीसा�� ी संगणकीकृत प्रणालीच्या अनुषंगाने पूरक कामकाज जसे की, आवश्यक त्याप्रमाणे डाटा एन्ट्री करणे, पक्षकारांचे फोटो व अंग�� याचे �� से घेणे, दस्त स्कॅन करणे, थंबनेल व इतर अहवालाच्या प्रींट घेणे इत्यादी कामे दुय्यम निबंधक यांच्या सूचनेप्रमाणे व नियंत्रणाखाली पार पाडणे अभिप्रेत आहे.

 • राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी, ई मेल आयडी व पत्ते याची माहिती को�� े उपलब्ध होईल ?
   

  राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कार्यक्षेत्र, दूरध्वनी, ई मेल आयडी व पत्ते यांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Organisation या सदराखाली Offices या �� िकाणी उपलब्ध आहे.
 • राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात कामकाजाची वेळ काय असते ?
   

  • राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सकाळी 10 ते संध्याकाळी 5.45 पर्यंत कार्यरत असतात व या वेळेमध्ये दस्त नोंदणीसा�� ी सादर करता येतो.
  • मात्र, नागरिकांच्या सोयीसा�� ी, मुंबई ,मुंबई उपनगर, �� ाणे,कल्याण, पनवेल व पुणे येथील काही कार्यालये सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत व काही कार्यालये दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत कार्यरत असतात.
  • याव्यतिरिक्त, नागरिकांच्या सोयीसा�� ी पुणे व पनवेल येथील काही कार्यालये रविवारी आणि दुस-या व चौथ्या शनिवारी कार्यरत असतात.मात्र या कार्यालयांना गुरुवारी आणि दुस-या व चौथ्या बुधवारी सुटटी असते.

  सविस्तर यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर listof holidaysया �� िकाणी उपलब्ध आहे.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]