विभागाचे कामकाज व प्रशासकीय संरचना

 • नोंदणी व मुद्रांक विभागाकडून कोणत्या स्वरुपाचे कामकाज केले जाते ?
   

  नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वैधानिक जबाबदा-या खालीलप्रमाणे आहेत -

  • नोंदणी अधिनियम, १९०८ नुसार दस्तांची नोंदणी करणे,
  • महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम (पूर्वीचा मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८) व भारतीय मुद्रांक अधिनियम, १८९९ ची अंमलबजावणी करणे व
  • विशेष विवाह अधिनियम, १९५४ नुसार विवाह संपन्न करणे.

  या अनुषंगाने विभागाकडून पुढील प्रकारचे कामकाज केले जाते.

  अ) नोंदणीविषयक-

  • दस्तांची नोंदणी करणे
  • नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रतिलिपी (Copy) तयार करुन अभिलेख जतन करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे.
  • नोंदणी केलेल्या दस्तांच्या सूची (Index) तयार करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे.
  • नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रती व सूची मागणीनुसार पाहणीसा�� ी व व्यवहारांचा शोध घेण्यासा�� ी (Inspection & Search ) उपलब्ध करुन देणे.
  • नोंदणी केलेल्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या दस्तांची माहिती, मिळकत अभिलेखात (७/१२ व मिळकत पत्रिका) फेरफार घेण्यासा�� ी संबंधित यंत्रणकडे पा�� विणे.
  • नोंदणी अधिनियमाच्या अंमलबजावणीसा�� ी नियम तयार करणे.
  नोंदणी अधिनियमामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा सुचविणे.

  ब) मुद्रांक विषयक-

  • मुद्रांक अधिनियमांची अंमलबजावणी करणे
  • मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार मुदांक शुल्क वसुली करणे
  • मुद्रांक शुल्क भरण्याच्या विविध पध्दतीचे व्यवस्थापन व नियंत्रण करणे
  • मुद्रांक शुल्क प्रयोजनासा�� ी स्थावर मिळकतीचे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करणे
  • मुद्रांक अधिनियमामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा सुचविणे.

  क. विवाह विषयक-

  • विशेष विवाह कायदा, 1954 अन्वये इच्छुक वधूवरांचे विवाह संपन्न करुन विवाह प्रमाणपत्र देणे.
  • अगोदरच झालेल्या विवाहाची, विशेष विवाह कायदयान्वये नोंदणी करणे.
 • नोंदणी व मुद्रांक विभागाची प्रशासकीय रचना कशी आहे ?
   

  • नोंदणी व मुद्रांक विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिपत्याखालील विभाग असून त्यावर मंत्री (महसूल) यांचे नियंत्रण असते.
  • मंत्रालयीन स्तरावर, सचिव (मदतकार्ये व पुनर्वसन) हे या विभागाचे सचिव आहेत.
  • नोंदणी महानिरिक्षक तथा मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य हे या विभागाचे विभाग प्रमुख असून, त्यांचे कार्यालय, पुणे येथे आहे.
  • क्षेत्रीय स्तरावर या विभागाची रचना पुढीलप्रमाणे आहे-
  1. दस्त नोंदणीसा�� ी संपूर्ण राज्यात एकूण 507 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे प्रत्येक तालुक्यासा�� ी एक कार्यालय आहे.
  2. दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रणासा�� ी जिल्हा स्तरावर सह जिल्हा निबंधक यांची 34 कार्यालये आहेत
  3. मुंबई वगळून इतर जिल्हयांचे सह जिल्हा निबंधक हे मुद्रांक विषयक कामकाजासा�� ी मुदांक जिल्हाधिकारी देखील आहेत.
  4. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयांमध्ये, मुद्रांक विषयक कामकाजासा�� ी मुद्रांक जिल्हाधिका-यांची ६ स्वतंत्र कार्यालये आहेत.
  5. राज्यात या विभागाचे मुंबई,पुणे,�� ाणे, नाशिक, औरंगाबाद,नागपूर,अमरावती व लातूर असे एकूण 8 प्रादेशिक विभाग असून त्यावर नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक यांचे नियंत्रण असते.
  6. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्हयांचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेवर अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांचे नियंत्रण असते.
  7. राज्यातील मुद्रांक कागदांची मागणी,पुरव�� ा व वितरण यावर अप्पर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांचे नियंत्रण �� ेवले जाते.
  8. राज्यातील जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. मात्र मुंबई शहर, मुंबई उपनगर व पुणे या 3 जिल्हयासा�� ी विवाह अधिका-यांची स्वतंत्र कार्यालये आहेत.
  9. वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्यासा�� ी क्षेत्रीय स्तरावर उपसंचालक/ सहाय्यक संचालक, नगररचना,(मूल्यांकन) यांची 7 कार्यालये असून त्यांचेवर राज्यस्तरावरून सह संचालक, नगर रचना,(मूल्यांकन) यांचे नियंत्रण असते.
  10. पूर्वी छायाचित्रित करण्यात आलेल्या दस्तांचे अभिलेख जतन करण्यासा�� ी, पुणे येथे शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय अस्तित्वात आहे.

 • नोंदणी व मुद्रांक विभागात दस्त नोंदणी संदर्भात यंत्रणा कशी आहे ?
   

  • नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार,दस्त नोंदणीचे अधिकार दुय्यम निबंधक यांना असून राज्यात दुय्यम निबंधकाची एकूण 507 कार्यालये आहेत.सर्वसाधारणपणे प्रत्येक तालुक्यासा�� ी एक कार्यालय अस्तित्वात आहे.
  • नोंदणी अधिनियमातील तरतुदींनुसार दुय्यम निबंधक यांच्या दस्त नोंदणी विषयक कामकाजावर सह जिल्हा निबंधक यांचे नियंत्रण व पर्यवेक्षण असते. राज्यात सह जिल्हा निबंधक यांची एकूण 34 कार्यालये आहेत.
  • प्रादेशिक विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक, त्या प्रादेशिक विभागातील सह जिल्हा निबंधक आणि दुय्यम निबंधक यांच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण �� ेवतात.
  • राज्यातील संपूर्ण नोंदणी यंत्रणेवर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांचे नियंत्रण असते.
 • मुद्रांक शुल्क कायदयाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कशी आहे ?
   

  • राज्यातील सह जिल्हा निबंधकांना (मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून) महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमान्वये मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.
  • मुंबई शहर जिल्हयासा�� ी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय आहे, तर मुंबई उपनगर जिल्हयामधील अंधेरी,बोरीवली व कुर्ला या तीन तालुक्यांसा�� ी अनुक्रमे मुद्रांक जिल्हाधिकारी अंधेरी, बोरीवली व कुर्ला अशी स्वतंत्र कार्यालये अस्तित्वात आहेत.
  • मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडून मुद्रांक शुल्क विषयक अभिनिर्णय देणे, मुद्रांक शुल्क प्रयोजनार्थ मिळकतीचे बाजारमूल्य निश्चित करणे, कमी पडलेल्या मुद्रांक शुल्काची वसूली करणे व मुद्रांक शुल्काचा परतावा देणे इत्यादी प्रकारचे काम केले जाते.
  • मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेले मिळकतीचे बाजारमूल्य मान्य नसेल, तर संबंधीत पक्षकारांना त्या प्रादेशिक विभागाच्या नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक यांचेकडे अपील दाखल करता येते.
  • मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलले दस्तऐवजाचे वर्गीकरण मान्य नसेल,तर संबंधीत पक्षकारांना नोंदणी महानिरीक्षक व मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडे अपील दाखल करता येते.
 • वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याची यंत्रणा कशी आहे ?
   

  वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याची प्रक्रीया महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे खरे बाजारमूल्य निश्चित करणे)नियम,1995 अन्वये �� रवून देण्यात आली आहे. त्यानुसार –

  • राज्यातील मुंबई ,पुणे,�� ाणे,नाशिक, नागपूर, व अमरावती या प्रादेशिक विभागांसा�� ी असलेले उप संचालक/ सहाय्यक संचालक,नगररचना,(मूल्याकंन) हे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याविषयीचे काम करतात. तर औरंगाबाद व लातूर या दोन प्रादेशिक विभागांसा�� ी हे काम औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक, नगररचना, (मूल्याकंन) यांचेकडून केले जाते.
  • या उप संचालक/सहाय्यक संचालक,नगररचना (मूल्यांकन) यांचे सहाय्याने सह संचालक, नगररचना, (मूल्यांकन) महाराष्ट्र राज्य,पुणे हे राज्यासा�� ीचे वार्षिक मूल्य दर तक्त्याचे प्रस्ताव तयार करुन नोंदणी महानिरीक्षक तथा व मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांचेकडे मान्यतेसा�� ी सादर करतात.
  • नोंदणी महानिरीक्षक तथा व मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांचे मान्यतेनंतर वार्षिक मूल्य दर तक्ते अंतिम केले जातात व प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारी पासून ते अंमलात येतात.
 • विवाह नोंदणीच्या संदर्भात विभागामधील यंत्रणा कशी आहे ?
   

  विशेष विवाह कायदा, 1954 अन्वये खालील कामे विवाह अधिका-यांकडून पार पाडली जातात.

  1. � इच्छुक वधूवरांचे विवाह संपन्न करुन विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.
  2. अगोदरच झालेल्या विवाहांची, विशेष विवाह कायदयाअंतर्गत नोंदणी करणे.


  राज्यातील जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक हे त्या जिल्हयासा�� ी विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर व पुणे या 3 जिल्हयांसा�� ी विशेष विवाह अधिका-यांची स्वतंत्र कार्यालये आहेत.

  वैदीक पध्दतीने संपन्न झालेल्या विवाहांची नोंदणी महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम,1998 नुसार करण्याचे काम पूर्वी या विभागातील दुय्यम निंबधकांकडून केले जात होते. तथापि, आता हे काम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नियुक्त करण्यात आलेल्या विवाह निबंधकांकडून केले जाते.

Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]