• शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम-८ अन्वये व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध नियम, २०१३ मधील नियम-३ अन्वये नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे ही 'नागरिकांची सनद' तयार करण्यात आली आहे.
  • विभागातील प्रत्येक कार्यालयातर्फे दिल्या जाणा-या सेवा, त्या प्राप्त करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, आवश्यक शुल्क व सेवा देण्यास लागणारा कालावधी इ. सर्व बाबींची या सनदेद्वारे नागरिकांना हमी देण्यात येत आहे.
  • विभागातील दुय्यम निबंधक कार्यालय, सह जिल्हा निबंधक कार्यालय, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय ते नोंदणी महानिरीक्षक कार्यालय अशा विविध स्तरावरील सर्व ७ प्रकारच्या कार्यालयांसाठी स्वतंत्र सनद तयार करण्यात आली आहे.
  • ही सनद नागरिकांना या वेबसाईटद्वारे FAQs, Mobile app, E-Book आणि PDF Book आदी विविध माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
  • नागरिकांच्या सनदेमध्ये दिलेल्या माहितीबाबत आवश्यकतेनुसार पूरक माहितीसाठी विभागाची मुख्य वेबसाईट www.igrmaharashtra.gov.in पहावी.
Copyright © 2014 IGR Maharashtra
All Rights Reserved.
[Best viewed in IE10+, Firefox, Chrome , Safari, Opera.]